Ad will apear here
Next
आभाळाची छत्री...

माझ्याकडे एक छत्री आहे. माझी आभाळाची छत्री.. गुलाबी रंगाची, लांब दांड्याची....या छत्रीला मी जसा विसंबत नाही, तशी छत्रीसुद्धा मला कधी विसंबत नाही...
.....
माझ्याकडे एक छत्री आहे. माझी आभाळाची छत्री.. गुलाबी रंगाची, लांब दांड्याची. रंग बऱ्यापैकी मळलेला आहे. गंजलेल्या तारांच्या गंजाच्या छटा त्यावर उमटल्या आहेत. कधी कधी तारा सुटतात. त्या मी परत बसवून घेतो. पाऊस सुरू व्हायच्या आधीपासून म्हणजे मेपासून ते पाऊस संपल्यानंतर अगदी ऑक्टोबरपर्यंत मी त्या आभाळाच्या छत्रीला अंतर देत नाही. विसरत नाही म्हटले तरी, दोन तीनदा तरी ही छत्री दुकानात, खानावळीत विसरून आलोय; पण तितक्याच प्रयत्नाने ती शोधूनही आणाली. छत्रीला मी जसा विसंबत नाही, तशी छत्रीसुद्धा मला कधी विसंबत नाही. 

ही आभाळाची छत्री वारसा हक्काने माझ्याकडे आली आहे. माझ्या आभाळाने, माझ्या बाबाने दिलेली ती छत्री आहे. ह्याच छत्रीतून कधी कधी आम्ही दोघे अर्धे अर्धे भिजत भर पावसातून आलेलो आहोत. हीच छत्री मी बाबाचा डोळा चुकवून घेऊन गेलो आहे. बाबाने तीन-चार वर्षे वापरलेली छत्री मी त्याच्यानंतर पाच-एक वर्ष तरी वापरत आहे. अजूनही वापरणार आहे. ही छत्री उघडली की मस्त सर्र करून आवाज येतो आणि छत्रीतून प्राजक्ताची फूले पडावीत तशा आठवणी पडतात. पावसाने नाही भिजलो तरी आठवणीने मी नक्की भिजतो.

माझा डोळा चुकवून माझी मुलगी कधीतरी ती छत्री घेऊन जाते. हिस्ट्री रीपीट्स म्हणतात. जनुके एकच आहेत, ना काही झालं तरी. छत्री मला दिसेपर्यंत, मुलगी घरी येईपर्यंत मी बेचैन होतो. मुलीला मी सांगतो, ही छत्री तुझ्या आजोबांची आहे. ती हळूच एक कटाक्ष आजोबांच्या फोटोकडे टाकते आणि मी सांगायच्या आधी हळूच नमस्कार करते. तिला सांगावसं वाटत बेटा, माझ्यानंतर ही छत्री तुझीच आहे बरं.

असाच कधी कधी तूफान पाऊस पडतो. मी छत्री घेऊन बाहेर पडतो. पावसाकडे, माझ्या आभाळाकडे बघतो आणि सरकन छत्री उघडतो. माझी नेहेमीची आभाळाची छत्री....

- केदार साखरदांडे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZPZCH
Similar Posts
कल हो ना हो.... काही गाणी तुम्हाला काही केल्या विसरता येत नाहीत. त्या गाण्याशी निगडित तुमच्या आठवणी नेहमी ताज्या रहातात. ते गाण जेंव्हा जेंव्हा तुम्ही ऐकता तेंव्हा तेंव्हा तुमचे मन भूतकालात जाते आणि त्या आठवणी जाग्या होतात पुन्हा.. पुन्हा.. परत... परत...
फोडणी महात्म्य... रोजच्या जेवणातील भाजी, आमटी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ फोडणीशिवाय बनवले तर, विचारच करवत नाही ना..बरं ही फोडणी तरी एकाच प्रकारची असते का, नाही तिचेही किती नखरे... असे हे लज्जतदार फोडणी महात्म्य...
मै कौन हूँ? ‘मै कौन हूँ?’ म्हणजेच मी कोण आहे? हा प्रश्न अनेकदा आपण चित्रपटात स्मृतिभ्रंश झालेल्या नायकाला अथवा नायिकेला पडलेला असल्याचे पाहतो. हा प्रश्न मलाही नेहमी पडतो (माझा स्मृतिभ्रंश झालेला नाही, याची नोंद घ्यावी कृपया) आणि मग मी थोडासा गोंधळतो. मला हा प्रश्न का पडावा या विचाराने मी हैराण होतो आणि मग मी स्वत:ला शोधायला सुरुवात करतो
कधी तरी स्वत:साठी जगावं..... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस इतका यांत्रिक झालाय की आजूबाजूचा निसर्ग, त्याचे सौंदर्य बघणंच विसरून गेलाय. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, आपल्या आवडीनिवडी जपाव्यात हेदेखील तो विसरून चाललाय. त्यामुळे प्रत्येकाचा जणू यंत्रमानव झालाय. यातून बाहेर पडून स्वतःसाठी जगायची गरज आहे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language